घरातलं घरपण जाणवत नाही हल्ली
नात्यातलं नातं तरी कुठं जाणवतय?
पण चुकतय कोण ? मीच !
नेहमी माझंच, हो माझंच तर चुकतयं.
नाही ! नाही जाणवत घर त्या चार भिंतीत
आणि नाही रमत मन चारच माणसात स्वार्थीपणे,
पण नाही देता येत स्पष्टीकरण या सगळ्याचं मला
मग कबूल करतो मी, माझंच तर चुकतयं.
मी लहान होत असताना चार भिंतीं खूप मोठ्या होतात,
आणि चारच नाती, पण किती अंगावर येतात,
नेति नेति म्हणत म्हणे ब्रह्माचा शोध चाललाय,
कशाचं काय ? जाणवतय मला काहीतरी चुकतय.
गुंता आणि घुसमट काही नवीन नाही मला
पण प्रयत्नाने घेतोय प्रत्येक श्वास आता सेकंदभर जास्त
कुणाला समजावायला जाणार कोण चुकतं ते,
म्हणून माझं मीच कबूल करुन टाकलय, माझंच चुकतयं !




khup chhan kavita aahe.khup divasani ashi arthpurn kavita vachali.bar vatal.dipavlichya hardik subhechya.
kavita far chan ahe , condition far real ahe ani i think asa majayahi barobar zal ahe farak avdach ki me kavita karu shakli nahi , but tumi majya manatal lihitay asach watal , thanks,