कधी गार वारा, कधी गारा, कधी उजळ कधी वादळ, हे काय वेड्यासारखं ?
जा म्हंटलं काय थांब म्हंटलं काय, स्वतःचंच खरं करशील,
तू आलास की ताप होतो, संताप होतो,
भावनांची वादळं उठतात, वणवे पेटतात.
तू आलास की मन फार होतं, गार होतं,
तू नाही म्हंटलं तरी येतोस, हट्टी मित्रासारखा
चिडवतोस रडवतोस हसवतोस जगवतोस.
टपली मारुन अडवतोस, हात धरुन चालवतोस,
वाटतं तुझ्याशी भांडावं, तुला मार मार मारावं,
तुझ्यापासून लपावं, शुष्क सुकून जळून जावं.
वाटतं तुझ्या सोबत असावं, तुला नुसतंच पाहात रहावं,
चातकाच्या आधी तू माझ्याकडे ये, सागराच्या आधी तू माझ्याकडे ये,
ढेकळाच्या आधी तू माझ्याकडे ये, आभाळातनं आधी तू माझ्याकडे ये.
या वेळी येतानाही वेगळेपणानं ये, त्याचं जिवाभावाच्या आगळेपणानं ये.
मी रुसलो चिडलो तरी तुझाच, तू माझाचं. त्याच हक्काच्या भाबडेपणानं ये.
आला की भवती फेर धर, बरा वेडापिसा हो जोर धर,
मी पण थोडा रागाने म्हणेन ” अरे अरे जरा धीर धर”,
मी बाहेर आलो नाही तर तू आत ये. मला घरातून उचल,




sunder lihitos, khup motha ho, anek shubhechha.
aasach chhan lihit raha, maza mitra mhanun khup bara vatatay.
Great…!!!
Thanks a lot Tushar. Hope you like the rest of them too. Keep reading and keep in touch. Thanks again. TC .. Arun
Thanks a lot Jitu. Tuzhya shubheccha, saddichha baddal manapasun dhanyawad.