Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘नाती’ Category

घरातलं घरपण जाणवत नाही हल्ली

नात्यातलं नातं तरी कुठं जाणवतय?

पण चुकतय कोण ? मीच !

नेहमी माझंच, हो माझंच तर चुकतयं.

नाही ! नाही जाणवत घर त्या चार भिंतीत

आणि नाही रमत मन चारच माणसात स्वार्थीपणे,

पण नाही देता येत स्पष्टीकरण या सगळ्याचं मला

मग कबूल करतो मी, माझंच तर चुकतयं.

मी लहान होत असताना चार भिंतीं खूप मोठ्या होतात,

आणि चारच नाती, पण किती अंगावर येतात,

नेति नेति म्हणत म्हणे ब्रह्माचा शोध चाललाय,

कशाचं काय ? जाणवतय मला काहीतरी चुकतय.

गुंता आणि घुसमट काही नवीन नाही मला

पण प्रयत्नाने घेतोय प्रत्येक श्वास आता सेकंदभर जास्त

कुणाला समजावायला जाणार कोण चुकतं ते,

म्हणून माझं मीच कबूल करुन टाकलय, माझंच चुकतयं !

Read Full Post »

कुणा हसावे, कुणा रडावे, सगळे माझे अपुले,

दु:ख मी कुणापुढे मांडावे , ऐकण्या न कुणी थांबले.

त्यांनी दिलेल्या कष्टांची कहाणी त्यांनाच ऐकवावी,

की त्यांच्याच कमतरतांची पदे रचून मी जगापुढे गावी.

या सा-या गोष्टींचा मलाच विचार करावा लागेल,

कारण त्यांच्या अपमानाचं दु:ख मलाच सोसत रहावं लागेल.

या भावनांच्या कल्लोळाला, मनातच दाबून टाकावं लागेल,

सगळे जण आपले रहावे, म्हणून मला असं वागावंच लागेल.

Read Full Post »

Older Posts »

Follow

Get every new post delivered to your Inbox.