सरसर म्हणता आयुष्य सरतंय
त्यातलंच एखादं वर्ष आलं काय नी गेलं काय ?
तास सरतात, दिवस सरतात महिने सरतात अन ऋतुही
नवल काय ?
सूर्य तोच, दिशाही त्याच
घडतंय कोणी? बिघडतंय काय?
आज संध्याकाळ पाहू, उद्या पहाट
वर्षावर्षाचा दिनक्रम तोच, शिकायचं काय ?
संध्या नंतर पहाट, हा नियम निसर्गाचा
उलट्या पावली खोल अंधारात, हा माणसाचा.
वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या, आत्मग्लानीच्या अंधारात
उगवतीचा सूर्य तुम्हास आंधळ्यांची पहाट, दुसरं काय?
अभिमान सूर्य उगवतात, तळपतात
स्वभिमानाचं उजाडतंच नाही.
मृत्यूसांझेला निवळ्तात, मावळतात
आंधळ्यांना हे दिसतंच नाही
डोळ्यांचा आंधळा तरी जागा असतो
बुद्धीच्या आंधळ्याने सूर्य पाहिला न पाहिला काय ?
ज्याने उजेड अनुभवला तो जागला
झोपल्यांपुढे दिवल्या पेटवल्या न पेटवल्या काय?
हाकारायचं किती ? जागवायचं तरी कीती ?
दिवाभरच्या उबेवर, अपेक्षांना जगवायचं तरी किती ?
स्वतःहून अडाणीपणाच्या ओझ्यांच्या गाढवांपुढे
पुराणं पाजळली काय नी पेटवली काय ?



