Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘घननिळा’

निळे निळावले, भाळीचे लिखित, स्पर्शलासे भाळ निळा, श्रीहरी श्रीहरी

निळे मोती सर पाझरती डोळा, दृष्टी साठवे जे रुप निळा, श्रीहरी श्रीहरी

लागलेसे ध्यानं, बासरीची तहान, कानी रुळला मंजुळ निळा, श्रीहरी श्रीहरी

निळा श्वास येई, निळा उच्छ्वास जाई, सभोवती गंध होई निळा, श्रीहरी श्रीहरी

निळी शब्द ओळ, निळे सूर रसाळ, विराजला वैखरीत निळा, श्रीहरी श्रीहरी

खोल उतरला आत, निळा निळाई प्रकाश, गच्च दाटला उरात निळा, श्रीहरी श्रीहरी

हरि कवळु पाहत, होती राधिकेचे हात, करी काय कवतिक निळा, श्रीहरी श्रीहरी

पावलात ताल, वृंदावनीची गो चाल, साथी रासात रंगला निळा, श्रीहरी श्रीहरी

तन झाले हरी, मन झाले हरी, ध्यानी ध्याता ध्यान निळा, श्रीहरी श्रीहरी

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.