Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘धुंद’

प्रेम म्हणे एकदाच होतं
पहिल्यांदाच एखाद्यावर होतं
नंतर कितीही वेळा झालं तरी
पहिलंच मनात राहून जातं

पण असं काहीही नसतं
प्रत्येकवेळी काहीतरी नवं असतं
जोडकागद जोडल्याप्रमाणे
ते पहिल्या पाठी जोडलं जातं

पहिल्यात पहिलेपण असतं
म्हणून त्याचं नवल असतं
नंतरचं अनुभवी होतं
शेवटी तेच जास्त जवळ असतं

पहिल प्रेम अल्लड असतं
दोघांनाही काही कळत नसतं
नव्या प्रेमाच्या धुंदीत
सगळीकडे प्रेमचं दिसतं

तडजोडीतलं पोक्त असतं
एकमेकांना समजून घेतं
वास्तवाचं भान ठेवून वावरतं
कारण संगतीने जगायचं असतं.

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.