मी फेकता मुका असा चेहरा तुझा लाल झाला
लाजून चंद्र गेला ढगाआड झाला
मिटुनी डोळे काय तू झाकिसी स्वये हातांनी,
लाजसी काय तू ह्या चांदण्याच्या सोबतीला.
डोळ्यात साठवू दे ह्या लाज-या रुपाला.
मौनास अर्थ आहे, स्पर्शास अर्थ आहे,
तरीही हट्ट आहे, शब्दांच्या बोलण्याला.
बळ इथे वापरावे एवढा धीट मी नाही,
भवती कुणीच नाही, मग लाजणे कशाला.
बघ उघडुनी डोळे प्रिये तुजसाठी ओंजळ फुलांची,
चांदण्यांनो दूर व्हा, लाज अजून सरु दे थोडी,
रात्र वाढता वाढता, वाढेल गोडी.
पहिलीच भेट आहे, लाजरी प्रीत आहे,
काय प्रेमाची रीत आहे, सांगणे कशाला.



