Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘प्रेमळ’

आई वाचूनचं रितेपण मला अजुन तरी माहीत नाही,

कारण गतायुष्याचा प्रत्येक क्षण, तिच्या प्रेमानं , मायेनं भरला आहे.

जेव्हा सभोवती दिसतात मला, मायेसाठी व्याकूळ झालेले डोळे,

तेव्हा, मला हेवा वाटतो स्वतःचाच, आणि अभिमानानं सांगावसं वाटतं,

की मला प्रेमळ आई आहे.

Read Full Post »

निष्पाप माया करताना

उगाचच मी जीव लावला

तुरळकच राहिली अखंड नाती

तुकड्यांचाच भार जास्त झाला

 

ज्या धाग्यानं जोडायला जावं

तोच धागा नेमका तुटतो

गाठ मारणं जमतंच नाही

आणि गुंता वाढतच राहतो

 

आच्छादलं स्वतःला इतरांच्यावर

मी अंतर्बाह्य पसरुन घेतलं

पण कोमल फुलांच्या जाणीवांपेक्षा

मला काट्यांनीच जास्त ओरबाडून घेतलं

 

रक्ताळलेल्या जखमा

कालपरत्वे भरत राहतात

तरीही रोजच्या भेटीगाठीत

नवीन ओरखडे उठतंच राहतात

 

आधी माझी ओळख होती

पाणीदार डोळे नि हसरी चणी

आता मला ओळखतात लोक

उदास चेहरा नि डोळ्यात पाणी

 

मनात ठरवलं ढळायचं नाही

आसवांना समजावलं गळायचं नाही

चढवून घ्यायचा बेगडी मुखवटा

दु:ख कवटाळून बसायचं नाही

 

पण अजूनही अखंड नाती आहेत

निष्पाप सोबत साथी आहेत

मग स्वतःला बदलायचं कोणासाठी

ज्यांनी रडवलं त्यांच्यासाठी ?

 

मग पुन्हा ठरवलं बदलायचं

मनमोकळं हसायचं

बागडायचं स्वतःच्या आनंदासाठी

जगायचं प्रेमाच्या माणसांसाठी.

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.