Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘भय’

भय करते
मनात सलते
अनामिक भीती
काहीसे हरण्याची

 

सुटू पाहते माझे मी पण
अस्तित्वाहून उरते आपण
वाट पाहते हे जीवन
स्वतःस मारुन जगण्याची

 

जे भास नव्हे ते सत्य नव्हे ही
शब्दावाचून प्रगट तरीही
अनुभूत तयाचे आहे म्हणणे
समर्थता न शब्दाची

 

साक्ष कुणाची, कोण निराळा
कर्म कुणाचे, ज्ञान कुणाचे ?
अलिप्त अर्पित व्यवहारी
सहज ते कर्तृत्व कोणाचे ?

 

आपलाची आपण चालतसे खेळ
खेळतसे शिव जीवभावे
इतुकेनी देहताप विरह व्याकूळ
‘मी’चा मरण आकांतं भेदभावे.

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.