Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘भावना’

माझी कविता तरंग माझ्या मनाचा,

होतो उपहास तिचाही , होतो जसा भावनांचा,

 

असतो तिच्यात उल्हास कधी, कधी ओघ प्रेमाचे,

आसवातही रमते क्षणभर, कधी दु:ख विरहाचे.

 

कधी डोकवावे निसर्गातही जाणून घेण्या कथा,

कधी माझ्या नकळतही ती प्रकटवते व्यथा.

 

मनातली तीव्र तळमळ घेते आकार कवितेचा,

ती माझे सृजन असली तरी मलाच आधार तिचा.

Read Full Post »

मनातल्या मनात

काटेरी फुलांच्या, फुलांच्या काट्यांच्या,
जुळवल्या ओळी, नी बनल्या त्या कविता,
मनातल्या मनात….

 

उंबरठा दाराचा, कौलारु घराचा
गंध माझ्या मातीचा, उन्हाळा स्मृतीचा
मनातल्या मनात….

 

पावसाच्या सरी कधी अंगाअंगावरी
कधी कोंदटल्या घरात
मनातल्या मनात….

 

फुलपाखराचे रंग, माझे पारिजात अंग
कधी पाखराच्या संग, घेई भरारी नभात
मनातल्या मनात….

 

आसवांची सोबत, कधी उदास एकांत
परि अल्लड झोके कधी प्रेमाच्या भरात
मनातल्या मनात….

 

कधी सोबती शोधत, कधी सोडून सोबत
परि नेहमी एकटाच  केला जगाचा प्रवास
मनातल्या मनात….

 

हळवी मन काया, सोडविली माया
कधी गुंतविली उगाच, भावनेच्या भरात
मनातल्या मनात….

 

प्रेम खूप केले , संन्यासीही म्हणविले
होते नव्हते लुटविले, काही राहिले तरीही
मनातल्या मनात….

 

नाही शब्दांचे केवळ , हे वाहिले ओघळ 
वेळोवेळी प्रसवल्या, भाव मोत्यांचीही माळ
माझ्या मनात मनात.

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.