Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘वरदान’

मी तोडल्या साखळ्या हातीयांनी स्वतःच्या

पण काही घाव घणाचे हातावरही पडले

अन ओरखडे साखळकड्यांचे अंगभर

त्यात काही रेशीमपाशही तुटले

 

मुळात नकोच होता पाश कुठलाही

पण साधले काय आज ह्या मुक्तिने ?

स्वछंदता की एकाकीपण

की उध्वस्त भावविश्व पाशवी अहंकाराने?

 

वाहते केले अश्रू दबून ज्वाला होण्याआधी

झिडकारली घुसमट मोकळ्या श्वासासाठी

ना मोद ना खेद जीवनात कुणाचा

असहाय्य तडफड जगण्यासाठी

 

मी होवून भयभीत अगतिक नमून घ्यावे

की झुंज देत सोशीत उभे रहावे

परि कळेना कोण येथे लढतो कोणाशी

घाव कुणाचे, पडती कोणावर, जखमा उराशी.

 

तेच जीवन जे जगतो अश्वत्थामा

मागतो वरदान, मरणाचे

विश्राम शरशय्येवर भीष्माचा

चिंतन रणांगणाचे.

Read Full Post »

हळवे मन

मनास जेव्हा वेदनांचा सहन होत नाही भार
अवचित डोळ्यांतुन वाहते आसवांची करुण धार

साधा शब्दही धिक्काराचा मनास लागून राहतो
प्रेमाच्या दोन शब्दांसाठी जीव घुसमटून जातो

अबोल निसर्गाशीही होतो हळवा नाजुक संवाद
बोलक्या माणसांशी मात्र होतो कणखर वाद

आसवांच्या रुपाने होते वेदना मनातून मोकळी
नविन वेदनांसाठी जणु तयार होते पोकळी

मनाच्या ह्या हळवेपणाला शाप म्हणावे की वरदान ?
माझ्याच नशिबी का यावे हे दु:खाचे दान

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.