Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘सर’

हवी आहे पावसाची
एक सर उधार
कारण गेल्या वर्षी पाऊस
जरा कमीच पडून गेलाय

गेल्या वर्षी काय झालं
माझं मलाच कळलं नाही
पाऊस आला भिजवून गेला
मनात मुरायचा राहून गेलाय

पाऊस अवखळ अल्लड होत
मिठीत विसावतो दर वर्षी
गेल्या वर्षी मिठीतूनच काय
हातातूनही सुटून गेलाय

पाऊस असता नको होतो
नसता हवा हवा असतो
एकच सर हवी उधार
पाऊस अनुभवायचाच राहून गेलाय

तसं म्हणता काहीच नाही
नाही म्हणता बरंच काही
पाऊस नाही सुटला जणु
श्वासच घ्यायचा राहून गेलाय.

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.